
दिपकनगर तांडा येथे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण ‘मन की बात शिदोरी के साथ’
दिपकनगर तांडा येथे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण ‘मन की बात शिदोरी के साथ’ या संकल्पनेनुसार बूथ कमिटी प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांसोबत पाहिले.
अत्यंत उद्बोधक आणि अंतर्मुख करणारे मा.पंतप्रधानांचे मार्गदर्शन पुढील कार्यासाठी नवीन दिशा दाखवणारे ठरणार आहे.
त्यांच्या वक्तव्यातील काही महत्त्वाचे विषय:-
– अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या सर्वच भागांतून घेण्यात आलेल्या मेहनतीचे कौतुक वाटते आहे. यानिमित्ताने देशातील विविधतेतील एकता दिसली आणि देशभक्तीची सुखद अनुभूती आली.
– कुपोषणा विरुद्ध लढण्यासाठी करीत असलेल्या प्रोजेक्ट संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी दिली..
– ज्वारी, बाजरी या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या धान्याच्या शेतीला चालना देऊन लहान शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त हित कसे साधता येईल हा विषय त्यांनी मांडला..
– डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसायांचा प्रसार चांगल्या प्रमाणात झाला आहे. यातून होत असलेला विकास अत्यंत कौतुकास्पद आहे. खेडोपाडी ऑनलाईन व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून लोक त्यात यशस्वी होत आहेत.
भाषणाच्या शेवटी गणेश चतुर्थी, ओणमच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली..
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या विचारांच्या पॅनेलने ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच सौ.चैताली तानाजी राठोड, उपसरपंच सौ. सुवर्णा रामसिंग राठोड आणि सदस्यांचे स्वागत करून त्यांच्या ग्रामविकासाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व गावकऱ्यांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.