
तुळजापूर जवळ तीर्थ बु.येथे भाविकांसाठी ६५ खोल्या व मंगल कार्यालयाचे बांधकाम
श्रद्धा आणि विश्वासामुळे तीर्थक्षेत्रात भाविकांची गर्दी होत असते. त्यांची व्यवस्था उत्तम राखण्याची जबाबदारी देवस्थानाच्या ट्रस्ट वर येते. एक अर्थी भाविकांची सेवा ही ईश्वर सेवाच आहे. म्हणूनच येणारे भाविक समाधानी राहतील तर तीर्थक्षेत्रातील परमेश्वर प्रसन्न राहिल यात शंका नाही…
केदारपीठाच्या वतीने तुळजापूर जवळ तीर्थ बु.येथे भाविकांसाठी ६५ खोल्या व मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. या वास्तुस भेट देऊन पहाणी केली. यावेळी ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. सदर वास्तूचे उद्घाटन १५ मार्च रोजी करण्यात येणार असून भाविकांसाठी ते लवकरच उपलब्ध होणार आहे.