
तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावच्या सरपंच पदाच्या नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार या विजयी झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावच्या सरपंच पदाच्या नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार या विजयी झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी भाजपाचे कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष श्री.निर्मलकुमारजी यांचेही सर्वांना मार्गदर्शन लाभले.
काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपलं कर्तव्य असतं आणि ते सर्व मतदारांनी चोखपणे बजावले आहे.. पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. देशात अनेक गावांमध्ये हा प्रश्न आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात नळ देण्याची ‘हर घर जल’ योजना आदरणीय पंतप्रधानांनी हाती घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकेल, ज्यामुळे नागरिकांची योग्य सुविधा होऊन रोगराई देखील कमी होईल.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना घरे मिळवून देण्याची योजना देखील राबविली जात आहे. यावर्षी राज्य सरकार देखील १५ लाख नवीन घरे उपलब्ध करून देणार आहे. शौचालयाच्या दृष्टीने, सर्वांच्या स्वास्थ्याच्या हिताच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले असून शौचालयाच्या निर्मितीची योजना देखील राबविली जात आहे.
जनधन खात्यांमुळे सरकार द्वारे दिले जाणारे अनुदान आणि लाभार्थ्यांच्या रकमा थेट खात्यांमध्ये जमा होतात. शेतकरी सन्मान योजना, महिलांना प्रवासासाठी महिला सन्मान योजना अशा असंख्य योजनांमधून गेल्या ९ वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत भारतीय जनता पक्ष आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अविरत कटिबद्ध आहे. आपण सर्वजण देत असलेली साथ आणि पाठिंबा कायम राहावा हीच विनंती व नवनियुक्त सरपंचांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन..
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितिन काळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अॅड.दिपक आलूरे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे आदींची उपस्थिती होती.
#सरपंच #पोटनिवडणूक #निवड #भाजपा #अभिनंदन #शुभेच्छा #dharashiv #tulajapur #election