skip to Main Content
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रभागसंघांचे पदाधिकारी व समुदाय संसाधन व्यक्ति यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते. यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्व माता-भगिनींना दिल्या.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (#PMEGP) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (#CMEGP) या दोन्ही योजनांचा लाभ उमेदच्या गटातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा व लाभ घेण्यात काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले.
सदरील दोन्ही योजना या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाच्या आहे. येणार्या वर्षभरात इयत्ता ७ वी ते १० वी या वर्गात शिकत असणार्या जिल्ह्यातील २,००० मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती अधिकाधिक महिलांना व्हावी यासाठी योजनांचे माहिती पुस्तक तयार करत करण्याचा मानस आहे.
सदरील कार्यशाळेत ॲड.कल्पना निपाणीकर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे यांनी केले. त्यांनी उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यात एकूण १५,७३१ स्वयंसहाय्यता गट, ७६२ ग्रामसंघ आणि ५५ प्रभागसंघांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती दिली.
#महिला #दिन #कार्यशाळा #रोजगार #आत्मनिर्भर #धाराशिव #womenday #workshop #Employment #AatmnirbharBharat #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.