
महिला दिनानिमित्त तेरणा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नळदुर्ग व कळंब येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !
१,५०० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला..
महिला दिनानिमित्त तेरणा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नळदुर्ग व कळंब येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !
आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नळदुर्ग व कळंब येथे शिबिरे घेण्यात आली.
सदरील आरोग्य शिबिरामध्ये नळदुर्ग व कळंब परिसरातील सर्व वयोगटातील तब्बल १,५०० नागरिकांनी सहभाग घेतला. यात महिला, पुरुष तसेच बालकांचा समावेश होता.
यात प्रामुख्याने हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग तसेच विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी, उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी तेरणा हॉस्पिटल नेरुळ, नवी मुंबई येथे दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अजय घुगे, डॉ..व्यंकटेश पाटील, डॉ.रिया तिवारी, डॉ.सय्यद आयेशा, डॉ.उन्नती यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले.
याप्रसंगी नळदुर्ग व कळंब परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#तेरणा #आरोग्य #शिबिर #धाराशिव #terna #health #camp #dharashiv