skip to Main Content
ता.धाराशिव येथे भाजपा-शिवसेना युती प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ ‘कार्यकर्ता बैठक’ घेण्यात आली.

ता.धाराशिव येथे भाजपा-शिवसेना युती प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ ‘कार्यकर्ता बैठक’ घेण्यात आली.

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक-२०२३ च्या अनुषंगाने ओंकार मंगल कार्यालय, आळणी, ता.धाराशिव येथे भाजपा-शिवसेना युती प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ ‘कार्यकर्ता बैठक’ घेण्यात आली.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व सर्व घटकांचा विचार करुन पॅनल उभे केले आहे.
राज्यात असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणि त्यांच्या पाठीशी असलेले मतदार यामुळे आपला विजय होईल हा विश्वास आहे..
सर्वसामान्य जनतेचा शिंदे-फडणवीस सरकारवर असलेला विश्वास, पक्ष नेतृत्वाचा प्रभाव आणि आपल्या कार्यपद्धतीमुळे शेतकरी विकास पॅनल विजयी होणार अशी खात्री वाटते.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानला भेट दिली. संस्थानचे प्रमुख ह.भ.प.श्री.महादेव महाराज तांबे, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज तांबे व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी धाराशिव तालुक्यातील महायुतीचे ज्येष्ठ नेते, सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#कळंब #कृषी #उत्पन्न #बाजार_समिती #पंचवार्षिक #निवडणूक #Kamlab #election

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.