skip to Main Content
धाराशिव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

धाराशिव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

धाराशिव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षात देशात विविध विकास कामे झाली आहेत. जो गतिमान विकास होत आहे त्यामुळे जगात भारताचे स्थान अव्वल होत आहे. मा.मोदीजींनी मांडलेल्या नवभारताच्या संकल्पनेतून आज देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे.
या ९ वर्षातील विकास कामांची व योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी जून महिन्यात महा-जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने देश पातळीवरील नेते व मंत्री यांच्या विशाल सभेसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी घरोघरी जाऊन मोदी सरकारने केलेला कामांची माहिती देणार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जवळपास ६ लाख घरांशी नियमित संपर्क ठेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत.
सन २०१४ पासून पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा गतिमान विकास झाला आहे. विश्वगुरू होण्याकडे देशाची वाटचाल सुरू आहे. म्हणून महा-जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करतो.
धाराशिव जिल्ह्यात २ टप्प्यात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. देश पातळीवरील नेते व मंत्री यांच्या सभा होणार आहे. देशात गेल्या ९ वर्ष झालेल्या कामांची सकारात्मक बाजूची जनतेसमोर मांडणी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. २०१४ साली जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानावर असलेला भारत आज ५ व्या स्थानावर आला आहे. तर मोबाईल निर्मितीमध्ये १२ व्या स्थानावर असलेला भारत २ ऱ्या स्थानावर आहे.
यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मिती झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील ७५० पेक्षा अधिक मुला-मुलींनी प्रधानमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून यशस्वी उद्योग सुरू केले आहेत. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे प्रलंबित परवाने मोदी सरकारच्या काळात मंजूर झाले असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे आता वेगाने काम सुरू झाले आहे.
पुढील वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी धाराशिव जिल्ह्यात येणार आहे. तसेच तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल दिसून येईल. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदार संघात भाजपाचा खासदार व्हावा असा संकल्प आहे.
या सर्व कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संपर्क से समर्थन’ अभियाना अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील १,००० प्रभावशाली कुटुंबांची यादी करण्यात आली आहे. भाजपाचे मंत्री, वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर बुद्धीवंतांचे संमेलनही भरविण्यात येणार आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून विचार मंथन होईल. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगले मुद्दे पुढे येतील. याच धर्तीवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही संमेलन भरविण्यात येणार आहे.
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी लोकसभा क्षेत्रात ६० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘विकासतीर्थ’ योजनेसारखे मुद्दे जनतेसमोर मांडून त्याची माहिती देण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यात आणखी सुरत-चेन्नई आणि शक्तिपीठ महामार्ग सुरू होत आहे. याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी तामलवाडी ते पारगाव या महामार्गावर भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान सरमकुंडी येथे सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, ही विनंती..
भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून गेल्या ९ वर्षात झालेल्या विविध विकासकामांची माहिती फक्त एका मिस्ड कॉलवर मिळणार आहे. त्यासाठी ९०९०९०२०२४ या मोबाईल क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल करायचा आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम व विकासाच्या योजनांचीही माहिती दैनंदिन आपणास मिळू शकेल.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.अनिल काळे, श्री.सुधीर पाटील, श्री.सतीश दंडनाईक, श्री.सुनील काकडे, श्री.युवराज नळे, श्री.अभय इंगळे यांची उपस्थिती होती.
#मोदीसरकार #योजना #माहिती #धाराशिव #ModiGovernment #yojana #information #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.