श्री.शशिकांत दत्तात्रय नरवडे यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.शशिकांत दत्तात्रय नरवडे यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.शशिकांत नरवडे या माळुम्ब्रा, तुळजापुर येथील तरुणाने सलग ६ वर्ष अभ्यास करून हे मोठे यश मिळवले आहे. वडील एस.टी. मध्ये चालक आहेत. घरात नेहमीचीच आर्थिक अडचण असताना आई सुनंदा यांनी कोंबडी पालन, शेळी पालन करत घरात हातभार लावला. नरवडे दाम्पत्यानं अल्पशा उत्पन्नातून काटकसरीने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. शशिकांत बरोबर त्यांच्या आई-वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नरवडे कुटुंबीय तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवडले गेलेले प्रशासकीय अधिकारी देशाची धुरा सांभाळत असतात. त्यामुळे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी आहे.. पुढील देशसेवेसाठी अनंत शुभेच्छा..
#लोकसेवा #आयोग #परीक्षा #धाराशिव #Congratulations #upsc #exam #dharashiv