
इर्ला येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत.. विकसित भारतासाठी शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा ! रु.१ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण..
इर्ला येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत.. विकसित भारतासाठी शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा ! रु.१ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण..
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या ब्रीद वाक्याला धरून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आर्थिक समृद्धी आल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारत विकसित झाला असे म्हणता येणार आहे. यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज आहे.
विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार रोजगार निर्मितीवर भर देत असून युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पंतप्रधान मा.मोदी साहेब यांनी सुरू केलेल्या ‘विश्वकर्मा योजने’चा बारा बलुतेदारांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहे.
कौडगाव येथे सुमारे १०,००० रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र देखील तिरूपती देवस्थानाच्या धर्तीवर विकसित करण्यात येत आहे. तेर येथे गोरोबा काकांच्या मंदिराचा विकास आराखडा तयार केला असून, एक एक टप्पा आपण पुढे जात आहोत.
तसेच पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तेर मधील मंदिरे, पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून उत्खनन, म्युझियम आदी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामुळे देश, विदेशातील पर्यटक देखील तेरला भेट देतील. एकीकडे उद्योग तर दुसरीकडे पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
गावातील विकास कामांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असून गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. यासाठी आपण देखील पाठपुरावा करावा.
प्रत्येक गावातून वीजेसाठी ट्रांसफार्मरची मागणी वाढत आहे. उर्जामंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत चर्चा केली असून, त्यांनी पुरेसे ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे. थोड्याच दिवसात कृषिसाठी वेगळी उपाय योजना करण्यात येत असून सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.