
आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा हडको मैदान, तुळजापूर येथे यशस्वीरीत्या संपन्न..
आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा हडको मैदान, तुळजापूर येथे यशस्वीरीत्या संपन्न.. विजेत्या बार्शी संघास १.५ लाखाचे तर उपविजेत्या तुळजापूर संघास १ लाखाचे बक्षीस.. इतरही अनेक वैयक्तिक पारितोषिके व पुरस्कारांचे वितरण..
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निमंत्रित १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद व अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या प्रीमियर लिग स्पर्धेत बार्शी येथील आरसीसी क्लब संघाने विजेतेपद पटकावले तर तुळजापूर येथील अमोल कुतवळ अकॅडमीचा संघ उपविजेता ठरला. स्पर्धेनंतर फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजीत विजेत्या संघास बक्षीस वितरण करण्यात आले.
श्री.विनोद गंगणे यांच्या वतीने विजेतेपद पटकावलेल्या संघाला चषक व १.५ लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक विजेत्या संघाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सचिन पाटील यांच्या वतीने १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
स्थानिक पातळीवर घेण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून अधिकाधिक युवा खेळाडू राज्याला, देशाला मिळावेत अशी कामना आहे.