
गोरोबा काकांचा तेरणा काठ असंख्य दिव्यांनी उजळून निघाला..२२ दिवसांच्या प्रवासानंतर पालखीचे तेर नगरीत स्वगृही आगमन..
गोरोबा काकांचा तेरणा काठ असंख्य दिव्यांनी उजळून निघाला.. २२ दिवसांच्या प्रवासानंतर पालखीचे तेर नगरीत स्वगृही आगमन..
टाळ, मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष करत काकांची पालखी दाखल झाली. गावातील महिलांनी व नागरिकांनी पालखीच्या रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.
परंपरेने ठरल्याप्रमाणे जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिविक्रम मंदिरात कीर्तन सेवा झाली. गोरोबा काकांच्या राहत्या घरी पालखीची विधीवत पूजा, आरती करण्यात आली..