skip to Main Content
धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी भाजपा युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला.

धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी भाजपा युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला.

धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी पहिल्या सत्रात धाराशिव-कळंब विधानसभा, भूम-परंडा-वाशी आणि बार्शी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला..
यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यात जनतेने भाजपाला दिलेला कौल कार्याची प्रेरणा वाढविणारा आहे.. आगामी निवडणुकांतील विजयाची ही नांदीच म्हणावी लागेल..
”महाविजय-२०२४ या संकल्प पूर्तीसाठी मोदी सरकार व महायुती सरकारच्या विविध योजना, विकासकामे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावीत.. जेणेकरून सरकारला व पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये जनतेचे समर्थन मिळेल.” असे आपल्या संबोधनात त्यांनी सांगितले. या कार्यासाठी माझ्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कटिबद्ध आहेत..
येणाऱ्या काळात आपली जबाबदारी वाढली असून, ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत राहावे..
याप्रसंगी आमदार श्री.राजेंद्र राऊत, माजी आमदार श्री.सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केनेकर, मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस श्री.किरण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.श्री.अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष श्री.संताजी चालुक्य-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.