
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह पाहणी केली..
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह पाहणी केली..
धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या व अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. जिल्ह्याच्या विकासात हे एक मोलाचे काम असून ही संस्था एक आदर्श संस्था म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नरत आहोत..
जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाठपुरावा सुरू होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करताना ही इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरता येईल, या अनुषंगाने संबंधित वास्तुविशारद सल्लागारांसमवेत बैठका घेऊन अनुषंगिक बदल करून घेतले होते.
सन २०१८ मध्ये धाराशिव येथील महाआरोग्य शिबिरादरम्यान तत्कालीन वैद्यकीय मंत्री ना.श्री.गिरीष महाजन साहेब यांनी सर्वप्रथम धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची घोषणा केली व तदनंतर २०१९ मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले होते. याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती गठित करून अहवालही शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने शासन निर्णय प्रलंबित राहिला.
सततच्या पाठपुराव्यानंतर ठाकरे सरकारने शासन निर्णय निर्गमित केला, परंतु त्या अनुषंगाने ठोस कृती न झाल्याने भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने एमबीबीएस प्रवेश मान्यता नाकारली. मात्र शिंदे-फडणीस सरकार येताच तात्काळ या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा तपासणी करून घेण्यात आली व आवश्यक बाबींची पूर्तता करून भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने नाकारलेली मान्यता त्यावर्षीच मिळवून घेतली. यामुळे १०० अधिकच्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेणे शक्य झाले. धाराशिवकरांना तज्ञ डॉक्टर्स तर उपलब्ध झालेच शिवाय शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व इतर कारणांमुळे येथील अर्थकारणाला देखील बळ मिळणार आहे..
मा.फडणवीस साहेब यांच्या दौऱ्यात या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.. हे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल हा विश्वास वाटतो..
#शासकीय #वैद्यकीय #महाविद्यालय #धाराशिव #medical #college #dharashiv