
‘माझा मी चा शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वातंत्र्यसैनिक श्री.भास्कर नायगांवकर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील अनुभव जाणून घेतले.
केंद्रीय विद्यापीठाची स्थापना, मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित चित्रपट, स्मारके उभारण्याची त्यांनी मागणी केली. त्यांच्या ‘माझा मी चा शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चिलवडी येथील स्वातंत्र्यसैनिक श्री.बाबासाहेब जाधव यांनीही ना.देवेंद्रजी यांच्याशी याप्रसंगी संवाद साधला व मराठवाडा मुक्तीसंग्रामात चिलवडी, जिल्ह्याच्या योगदानाबाबत माहिती दिली. श्री.जाधव यांनी ‘असे झुंजलो आम्ही’ आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेले ‘वैभवशाली’ ही पुस्तके भेट दिली.
#मराठवाडा #मुक्ती #संग्राम #सेनानी #पुस्तके #धाराशिव #marathawada #mukti #sangram #freedomfighter #books #dharashiv