
अद्भुत.. अविस्मरणीय.. भव्य.. सर्वसमावेशक.. न भूतो न भविष्यती..
अद्भुत.. अविस्मरणीय.. भव्य.. सर्वसमावेशक.. न भूतो न भविष्यती..
प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने, आशीर्वादाने ‘मोदी@९ महा-जनसंपर्क अभियान‘ अंतर्गत उपमुख्यमंत्री, विकासपुरुष ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जाहीर सभा धाराशिव येथे संपन्न झाली..
उस्मानाबादचे ‘धाराशिव‘ हे नामकरण झाल्यानंतरची ही प्रथमच जाहीर सभा.. मोदी सरकारने या नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल ना.देवेंद्रजी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले..
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टेक्निकल टेक्सटाइल पार्क, शाश्वत सौर ऊर्जा प्रकल्प, तुळजापूर विकास आराखडा या आपल्या जिव्हाळ्याचा विषयांवर ना.देवेंद्रजी यांनी सकारात्मक भाष्य करून यासंदर्भात झालेल्या कामाचा त्यांनी लेखाजोगा मांडला..
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी ४५२ कोटी, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी ११,७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुढच्या जून पर्यंत पाणी आपल्यापर्यंत पोहचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. टेक्निकल टेक्सटाइल पार्क धाराशिव मध्ये होणार तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर आता वैद्यकीय संकुल उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींसाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.
याप्रसंगी १ रुपयात पीकविमा आणि शेतकरी सन्मान योजनेमध्ये वाढीव ६००० रुपयांची भर घातल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश झालेल्या विद्यार्थी मित्रांनी जिल्ह्यात मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक सत्कार केला व एसटी बस मध्ये महिलांना ५०% सवलत दिल्याबद्दल बंजारा समाजातील महिलांनी देखील ना.देवेंद्रजी यांचा सत्कार करून आशीर्वाद दिले..
यासभेतील सर्वात नेत्रदीपक क्षण म्हणजे आपल्या मोबाईलची टॉर्च लाऊन सभेसाठी आलेल्या जनसमुदायाने ना.देवेंद्रजी यांचे केलेले अनोखे ऐतिहासिक स्वागत.. संपूर्ण जनसमुदायाच्या सहभागातून अशा प्रकारचे स्वागत हे ना.देवेंद्रजी यांच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.
याप्रसंगी विधान परिषद गटनेते श्री.प्रवीण दरेकर, सहकार मंत्री ना.श्री.अतुल सावे, आमदार श्री.संभाजी पाटील निलंगेकर, आमदार श्री.अभिमन्यू पवार, आमदार श्री.राजेंद्र राऊत, आमदार श्री.सुरेश धस, प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केणेकर, मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, श्री.सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, प्रदेश चिटणीस श्री.किरण पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
#DevendraFadnavis #dharashiv #tuljapur #NarendraModi