
१,००० कोटी रुपयांच्या तुळजापूर विकास आराखड्याचे ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सादरीकरण करतानाचे अभूतपूर्व, अविस्मरणीय क्षण..
१,००० कोटी रुपयांच्या तुळजापूर विकास आराखड्याचे ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सादरीकरण करतानाचे अभूतपूर्व, अविस्मरणीय क्षण..
सर्व भक्तांनी मिळून बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. आई तुळजाभवानीची सेवा करण्याची ही अद्वितीय संधी आहे.
या विकास आराखड्यात भाविकांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची निर्मिती, ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना नियोजित वेळेत दर्शन, आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त २ प्रतिक्षालये, दुकाने, शौचालये, टी.व्ही.स्क्रीन, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
प्रत्यक्ष प्रवेशाच्या ठिकाणी १,००० भाविक क्षमतेच्या दर्शन मंडपात मोबाईल व पादत्राणे ठेवण्याची सुविधा करण्यात येईल. सुमारे १० एकर जागेमध्ये आई तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे सुमारे १०८ फूट उंचीचे शिल्प तसेच वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या पूर्ण जागेमध्ये बागबगीचा व ‘लाइट ॲण्ड साऊन्ड शो’ विकसित करून आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
सदर विकास आराखडा संपूर्ण तुळजापूर नगरीचा कायापालट करणारा ठरणार आहे. महाराष्ट्रातील युती सरकारच्या सहकार्यातून हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा लवकरच पूर्णत्वास जाईल हा विश्वास आहे.
#तुळजापूर #मंदिर #भाविक #धाराशिव #tuljapur #temple #dharashiv