skip to Main Content
पांगरधरवाडी येथे भेट देऊन उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला.

पांगरधरवाडी येथे भेट देऊन उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला.

पांगरधरवाडी येथे भेट देऊन उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. तसेच संबंधितांना उपयुक्त सूचना दिल्या.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाने ९ वर्षांत प्रचंड प्रगती केली. मा.मोदी साहेबांच्या या यशस्वी कार्यकाळातील ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारतभर ‘मोदी@९’ कार्यक्रमाचे भाजपाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात हे अभियान आपण भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पुढे नेत आहोत. याच अभियाना अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दि.१६ जून रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
तामलवाडी येथे जिल्हा हद्दीवर भव्य स्वागत झाल्यानंतर मा.देवेंद्रजी ‘विकासतीर्थ’ अंतर्गत पांगरधरवाडी, ता.तुळजापुर येथे आपल्या जिव्हाळ्याचा असलेल्या कृष्णा -मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करतील व परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधतील.
#सभा #नागरिक #जनता #धाराशिव #देवेंद्र #फडणवीस #assembly #citizen #public #DevendraFadnavis #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.