
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील महत्वपूर्ण विकासतीर्थ असून एक आदर्श संस्था म्हणून विकसित करणार!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील महत्वपूर्ण विकासतीर्थ असून एक आदर्श संस्था म्हणून विकसित करणार!
धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या व अद्यावत आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील १०० अधिकच्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. जिल्ह्याच्या विकासात हे एक मोलाचे काम असून ही संस्था एक आदर्श संस्था म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न आहोत.
जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाठपुरावा सुरू होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करताना ही इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरता येईल, या अनुषंगाने संबंधित वास्तुविशारद सल्लागारांसमवेत बैठका घेऊन अनुषंगिक बदल करून घेतले होते.
सन २०१८ मध्ये धाराशिव येथील महाआरोग्य शिबिरादरम्यान तत्कालीन वैद्यकीय मंत्री ना.श्री.गिरीष महाजन साहेबांनी सर्वप्रथम धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची घोषणा केली व तदनंतर २०१९ मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले होते. याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती गठित करून अहवालही शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने शासन निर्णय प्रलंबित राहिला.
सातत्याच्या पाठपुराव्यानंतर ठाकरे सरकारने शासन निर्णय निर्गमित केला, परंतु त्या अनुषंगाने ठोस कृती न झाल्याने भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने एमबीबीएस प्रवेश मान्यता नाकारली. मात्र शिंदे-फडणीस सरकार येताच तात्काळ या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा तपासणी करून घेण्यात आली व आवश्यक बाबींची पूर्तता करून भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने नाकारलेली मान्यता त्यावर्षीच मिळवून घेतली. यामुळे १०० अधिकच्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेणे शक्य झाले, तसेच धाराशिवकरांना तज्ञ डॉक्टर्स तर उपलब्ध झालेच शिवाय शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, डॉक्टर्स, अधिकारी कर्मचारी व इतर कारणांमुळे येथील अर्थकारणाला देखील बळ मिळणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विकासकार्य असणाऱ्या या महाविद्यालयाला कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.निर्मलकुमार सुराणा यांच्यासह मोदी @९ महाजनसंपर्क अभियान विकासतीर्थ भेट अंतर्गत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी निषेध व्यक्त करत यापुढे पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याउलट पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवस शांत बसून विद्यमान प्रधानमंत्री ना.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. आज केवळ त्यांच्या नेतृत्वामुळे जगात भारताची एक वेगळी वेगळी ओळख व प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. असे मत यावेळी श्री.निर्मलकुमार सुराणाजी यांनी व्यक्त केले..
या पूर्वीच्या भेटीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात आपल्या समोर मांडलेल्या अडचणींचे निराकरण केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. या ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळेच आपण वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
#शासकीय #वैद्यकीय #महाविद्यालय #धाराशिव #medical #college #dharashiv