लोकनायक डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे गाझी स्पोर्ट्स क्लब व साप्ताहिक रिपोर्टर परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या उस्मानाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.

सदरील स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात उद्योजक श्री.सचिन शिंदे यांच्या रॉयल चॅलेंजर्स संघाने उद्योजक श्री.श्यामअप्पा जहागीरदार यांच्या कॅपिटल संघावर विजय मिळवत चषक पटकावले आहे. विजेत्या संघाला चषक व रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी वाहेदभाई शेख, परंडा यांच्या वतीने विजेत्या संघ मालकास अर्धा तोळा सोन्याची अंगठी भेट देण्यात आली.
हॉटेल सागरचे मालक तारीखभाई शेख यांच्या वतीने ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून रेंजर सायकल उत्कृष्ट खेळाडू श्री.आशिष मायचारी, श्री.अक्षय बावस्कर यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आली.
याप्रसंगी श्री.सुधीर पाटील, श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, निहाल काजी, आयोजक, गाजी स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष तथा साप्ताहिक उस्मानाबाद रिपोर्टरचे संपादक असीम काझी, शकीब शेख, रईस शेख व क्रिकेट रसिकांची उपस्थिती होती.
#क्रिकेट #स्पर्धा #धाराशिव #cricket #Competition #dharashiv