
जिल्हा परिषद, धाराशिव येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ मुहर्तावर दिव्यागांना सहाय्यक उपकरणे वाटप सुरू करण्यात आले.
जिल्हा परिषद, धाराशिव येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ मुहर्तावर दिव्यागांना सहाय्यक उपकरणे वाटप सुरू करण्यात आले.
केंद्र सरकारच्या एडीआयपी (ADIP) योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात झालेल्या तपासणी व मोजमाप शिबिराच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना उपकरणे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी दिव्यांग बांधवांशी संवाद साधला.
मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने देशभरात ‘मोदी @९’ अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील याच धर्तीवर उपक्रम राबविले जाणार आहेत. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनेबद्दलची माहिती पोहोचवण्याचे काम हाती घेत आहोत.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा विकास होत आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. अनेक नवोद्योग जिल्ह्यात सुरू झाले आहेत. निश्चितच येणाऱ्या काळात जिल्ह्याचे रूप बदललेले असेल.
#योजना #दिव्यांग #वयोश्री #मदत #धाराशिव #yojana #Divyang #help #dharashiv