skip to Main Content
दिव्यांग बंधू-भगिनींना ३ चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग बंधू-भगिनींना ३ चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग बंधू-भगिनींना ३ चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व ब्लड सेंटर, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. शासकीय स्त्री रुग्णालयात नारळ पाणी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, डॉ.डी.डी.दाते, डॉ.प्रशांत कोल्हे, डॉ.एन.एस.तौर, प्रा.सुजाता गायकवाड, प्रा.शितल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.