
भारावून टाकणारे क्षण!! आयुष्यात डॉक्टर साहेबांनी किती माणसे कमावली हे अनुभवताना मन भारावून गेले
भारावून टाकणारे क्षण!! आयुष्यात डॉक्टर साहेबांनी किती माणसे कमावली हे अनुभवताना मन भारावून गेले.. ईश्वराने दिलेल्या एकाच आयुष्यात माणूस किती कर्तृत्व करू शकतो हे डॉक्टर साहेबांकडून शिकायला मिळते..
लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष म्हणजे खेड्या-पाड्यातून आलेली सर्वसामान्य जनता डॉ.साहेबांचे औक्षण करून, पेढे भरवून, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करत आहेत.
‘लोकनायक‘ हे लोकांनी दिलेले नामाभिधान किती सार्थ आहे याचा आज परत एकदा अनुभव घेतला..