skip to Main Content
महात्मा बसेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग !

महात्मा बसेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग !

महात्मा बसेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग !
वीरशैव लिंगायत समाजाची महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित होती. आपण नळदुर्ग जवळ राष्ट्रीय महामार्गा लगत अणदूर शिवारातील वन विभागाची जागा यासाठी निश्चित केली आहे. आपल्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.बी.एम.थोरात, कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्री.जोगदंड यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
सदरील जागा राखीव वन असून वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना अश्वारूढ पुतळा व इतर विकास कामे करण्यासाठी ना हरकत मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा पुतळा, ध्यान केंद्र, बगीचा, सुशोभीकरण, लाईट अॅण्ड साऊंड शो व बसवसृष्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे.
सदरील ठिकाण तुळजापूर, नळदुर्ग शहरापासून जवळ व राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने आणखी एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस आहे. यासाठी वन विभागाकडील १० एकर जागेची मागणी करण्यात येत आहे.
#संत #बसवेश्वर #पुतळा #लिंगायत #धाराशिव #basweshawar #statue #lingayats #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.