
‘मोदी @९’ अभियाना संदर्भात बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेण्यात आला
‘मोदी @९’ अभियाना संदर्भात बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
३० मे रोजी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ३० मे ते ३० जून या दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डा जी यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान संपन्न होत आहे.
विकास, सुरक्षा व राष्ट्राचा सन्मान वाढविणारी ही ९ वर्षे ठरली आहेत. ही विशेष उपलब्धी घरोघर पोहोचविण्यासाठी ‘मोदी @९‘ हे अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपा सरकारची ही उपलब्धी प्रत्येक घरी जाऊन सांगावयाची आहे.
या बैठकीला मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, प्रदेश चिटणीस श्री.किरण पाटिल व जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांनी मार्गदर्शन केले.
#मोदी #विकास #संघटन #धाराशिव #Modi #development #association #dharashiv #modi9 #9yearsofbjp