
पाथर्डी-आथर्डी, ता.कळंब सोसायटीवर भाजपचे वर्चस्व.. गावातील ठाकरे गटातील अनेकांचा भाजपात प्रवेश !
पाथर्डी-आथर्डी, ता.कळंब सोसायटीवर भाजपचे वर्चस्व.. गावातील ठाकरे गटातील अनेकांचा भाजपात प्रवेश !
कळंब तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाथर्डी-आथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत सोसायटी पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे.
याबद्दल पॅनल प्रमुख तथा भाजपा तालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळे आणि बाजार समितीचे संचालक श्री.अरुण चौधरी, नूतन संचालक श्री.कोंडीबा बसाळगे, श्री.रावसाहेब चौधरी, श्री.रवींद्र चौधरी, श्री.अशोक धुमाळ, श्री.भरत पिंगळे, श्री.मयूर पिंगळे, श्री.महादेव झटाळ, श्रीमती कुसुमताई बंडोबा चौधरी, श्रीमती रोहिणीताई बाळासाहेब साखरे, श्री.गोरोबा घेले, श्री.मोहन जाधव, श्री.केशव भारती यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
तसेच ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.जगन्नाथ झटाळ यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#निवडणूक #विजय #भाजपा #पक्ष #प्रवेश #धाराशिव #Election #victory #bjp #party #entrance #dharashiv