
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी शहरातील विविध कार्यक्रम संपन्न झाले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी शहरातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. तत्पूर्वी भगवंत मंदिराला भेट देऊन दर्शन घेण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदरील शिबिराबाबत सखोल माहिती तरुणांना देण्यात आली.
तसेच नगरपरिषद येथे बैठक घेऊन विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून त्यांना सूचना करण्यात आल्या.
#नगरपरिषद #शिबिर #मंदिर #धाराशिव #nagarparishad #Shibir #temple #dharashiv