
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी शहरात लाभार्थी मेळावा आणि नवमतदार संवाद बैठक
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी शहरात लाभार्थी मेळावा आणि नवमतदार संवाद बैठक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक उपयुक्त योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून अनेकांना लाभ होत आहे. लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व त्यांना झालेला लाभ याचा संयुक्तिक आढावा घेतला.
यावेळी अनेक लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शिवाजी महाविद्यालय येथे भेट देऊन नवमतदारांशी संवाद साधला. भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. साहजिकच येणाऱ्या काळात मतदार म्हणून त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरेल. या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
#लाभार्थी #महापुरुष #नवीन #मतदार #मेळावा #धाराशिव #Beneficiary #Greater #Voters #new #gettogether #dharashiv