
काक्रंबा, ता.तुळजापुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोकदादा देवगुंडे, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
काक्रंबा, ता.तुळजापुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोकदादा देवगुंडे, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये श्री.विशाल खाताळ, श्री.सद्दाम मुलाणी, श्री.विकास चंदनशिवे, श्री.दिगंबर मस्के, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.पप्पू देवगुंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.बबलू घोगरे, ह.भ.प.श्री.नागनाथ महाराज देवगुंडे यांच्यासह गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
काक्रंबा व परिसरातील विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या विकासाच्या मुद्द्यावर प्रभावित होऊन तसेच गावाचा विकास आपल्याच माध्यमातून होऊ शकतो अशी खात्री पटल्याने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
सदरील प्रवेशासाठी श्री.सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत गावातील काही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंह देशमुख, बाजार समिती संचालक श्री.सचिन पाटील, श्री.राजाभाऊ सोनटक्के, श्री.बाबा श्रीनाने, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
#पक्ष #प्रवेश #भाजपा #धाराशिव #Access #party #bhajpa #dharashiv