कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राजाभाऊ पाटील व उपसभापती पदी श्री.शेषराव चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. सर्वाधिक संचालक निवडून येत भाजपा हा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. धाराशिव तालुका कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करून १८ पैकी तब्बल १७ जागांवर आपण विजय मिळवला होता.
याप्रसंगी श्री.सुरेशभाऊ देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.सतीश दंडनाईक, जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, नूतन संचालक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #कार्यकर्ते #भाजपा #धाराशिव #Election #Victory #BJP #dharashiv