
तेरणा ट्रस्ट संचलित तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तेरणा ट्रस्ट संचलित तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राची यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षीही केंद्रातील एकूण ९ विद्यार्थी पोलीस भरती मध्ये यशस्वी झाले आहेत. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन माजी खासदार डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही प्रशासनात जावीत या अनुषंगाने २०१४ मध्ये कर्ज विद्यार्थ्यांसाठी सदरील केंद्राची स्थापना केली होती.
आज पर्यंत येथील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध पदावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमिक कार्यरत आहेत. यंदा यशस्वी झालेले विद्यार्थ्यांमध्ये विशाल साठे चोराखळी (मुंबई पोलीस), सोनाली विशाल साठे चोराखळी (ठाणे पोलीस), शिवराम व्हरकटे, कोळेवाडी (मुंबई पोलीस ), प्रीतम जगमे, शेकापूर (मुंबई पोलीस), सुनील अवचार, मेडसिंगा (मुंबई पोलीस) काका सुतार, सारोळा (औरंगाबाद पोलीस), प्रशांत शेळके, मोहा खामसवाडी (मुंबई पोलीस), विकास आळकुंठे रा.खामसवाडी, ता.कळंब, विश्वजित साळुंखे वडगाव सि. (मुंबई पोलीस) यांचा समावेश आहे.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, प्रा.गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ.विक्रमसिह माने, तेरणा स्टडी सेंटर समन्व्यक श्री.विठ्ठल गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.
#स्पर्धा #यश #विद्यार्थी #पोलीस #धाराशिव #Competition #Success #Exam #Police #dharashiv