
वडार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वडार समाज मेळाव्यात समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व माझा सत्कार केला.
तुळजापूर नाका, धाराशिव येथे वडार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वडार समाज मेळाव्यात समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व माझा सत्कार केला.
श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी कै.पै.मारुती चव्हाण वडार समाज आर्थिक विकास महामंडळातर्फे वडार समाजातील नागरिकांनी आपला विकास करून घ्यावा असे आवाहन केले.
कै.पै.मारुती चव्हाण वडार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केल्याबद्दल आमचा सत्कार करण्यात आला. वडार समाजाकरिता वडार भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देखील यावेळी दिले.
याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.राहुल लोणीकर, भाजपा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, धाराशिव नगरपालिकाचे गटनेते श्री.युवराजबाप्पा नळे, नगरसेवक श्री.दुर्गाप्पा पवार, श्री.विकास पवार, श्री.महादेव जाधव, श्री.प्रेम पवार, श्री.यश मंजुळे, श्री.प्रेम पवार, श्री.विशाल पवार, श्री.पिराजी देवकर, श्री.काशिनाथ घोडके, श्री.बाबासाहेब चव्हाण, श्री.अविनाश देवकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व वडार समाज बांधव उपस्थित होते.