
जिजाऊ चौक, धाराशिव येथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
जिजाऊ चौक, धाराशिव येथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मागील ९ वर्षात सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केलेल्या १ रूपयात पिक विमा, शेतकरी सन्मान योजना, महिलांना बसमध्ये ५०% सवलत अशा विविध योजना, प्रकल्प प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरीयर्सनी करावे असे आवाहन श्री.बावनकुळे साहेबी यांनी केले.
आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यातील युवांसाठी आपण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध स्पर्धा घेणार आहोत. तसेच त्या माध्यमातून क्रीडा विषयक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
युवक हा संस्कारित तसेच देश, धर्म यासाठी काम करणारा तयार व्हावा. जागतिक पातळीवर पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असताना एकही घटक या विकासापासून वंचित राहू नये याची जबाबदारी देखील वॉरियर्सनी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष श्री.राहुल लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे, भाजयुमो धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.मकरंद पाटील, युवा मोर्चा जिल्हा प्रभारी श्री.अमोल निडवदे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.