
आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे १०८ फुटांचे शिल्प हे तुळजापूर विकास आराखड्यामध्ये प्रमुख ऊर्जेचे आणि आकर्षणाचे केंद्र असणार आहे
आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे १०८ फुटांचे शिल्प हे तुळजापूर विकास आराखड्यामध्ये प्रमुख ऊर्जेचे आणि आकर्षणाचे केंद्र असणार आहे…
ही मूर्ती सर्वोत्कृष्ट घडावी, येणाऱ्या शेकडो पिढ्यांना त्यातून मोठी प्रेरणा मिळत राहावी अशा पद्धतीची ही मूर्ती असावी अशी आपली इच्छा आहे. म्हणूनच भारतातील कलात्मक दृष्टीने सर्वोच्च आणि महत्त्वपूर्ण असलेल्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली ही मूर्ती घडविण्याचा आपला मानस आहे..
त्या अनुषंगाने राज्याचे प्रभारी कला संचालक तथा जे.जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य श्री.रविंद्र मिश्राजी व जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन प्रा.श्री.विश्वनाथ साबळे यांची भेट घेऊन संवाद साधला..
सदर मूर्ती कशी असावी, या संदर्भात ३ फुटांच्या नमुना दाखल काही नामवंत मूर्तिकारांद्वारे संकल्पना मूर्ती तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर विषयातील तज्ञ सर्वोत्कृष्ट मूर्ती अंतिम करतील.