skip to Main Content
“मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी, धाराशिव येथे संपन्न झाले

“मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी, धाराशिव येथे संपन्न झाले

“मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी, धाराशिव येथे संपन्न झाले.. आपल्या अत्यंत उद्बोधक शैलीत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेले मार्गदर्शन ऊर्जादायी, कार्याची नवी दिशा देणारे आणि प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करणारे ठरले..
मा.मोदीजी म्हणाले की, “मन की बात या कार्यक्रमाने मला अनेक आव्हानाचं उत्तर मिळवून दिलं आहे. त्यातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि जनभाव कोट्यावधी लोकांसह माझ्या भावविश्वाचा अतूट भाग बनला आहे.”
बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम, स्वच्छता आंदोलन, खादी प्रेम, निसर्गाची गोष्ट, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असे जे विषय ‘मन की बात’ कार्यक्रमात आले ते जन आंदोलन झाले..
या १०० व्या पर्वाबाबत हजारो पत्रे, संदेश मा.पंतप्रधानांना आले आहेत. यात अत्यंत भावुक, अंतर्मुख करणारी देखील पत्रे आहेत. मात्र या कार्यक्रमाचे श्रेय आणि अभिनंदनाचे मानकरी ‘मन की बात’चे श्रोते आहेत असे देखील त्यांनी विनम्रपणे नमूद केले.
३ ऑक्टोबर २०१४ हा विजयादशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून या दिवशी हा प्रवास सुरू केला. ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या सकारात्मकतेचा अनोखा सण झाला आहे..
देशाच्या विकासाला एका नव्या उंचीवर नेणारा हा कार्यक्रम भारतच नव्हे तर जगभरात मा.पंतप्रधानांची एक नवी ओळख बनला आहे..
Narendra Modi Devendra Fadnavis BJP Maharashtra
#ManKiBaat #NarendraModi #NarendraModiji #radio #PMNarendraModi #PMOIndia #PM #PMModiji #india #democracy #मनकीबात #पंतप्रधान #मोदी

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.