
सांगवी, ता.धाराशिव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला..
सांगवी, ता.धाराशिव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला..
यात प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत रू.७८ लक्ष निधीतून पाईपलाईन, टाकी व विहीर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच आपल्या ७ लक्ष रू. आमदार निधीतून पूर्ण झालेल्या बालाजी मंदिरासमोर सिमेंट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायत १५ व्या वित्तआयोग रू.१५ लक्ष निधीतून गावात पेव्हर ब्लॉक बसवणे, नालीचे बांधकाम करणे, सार्वजनिक शौचालय व सिमेंट रस्ता करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, सरपंच श्री.दहिभाते, श्री.दिनेश देशमुख, श्री.दयानंद शिंदे, चेअरमन श्री.गोवर्धन मेंढेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमर कोल्हाळ, श्री.नितीन स्वामी, श्री.भोमेश्वर सुरवसे, श्री.गोविंद सुतार, व्हाइस चेअरमन श्री.बालाजी कोल्हाळ, ग्रामपंचायत सदस्य श्री.अजित शिंदे, श्री.श्याम कुलकर्णी, श्री.दीपक पाटील, श्री.प्रकाश कदम, श्री.अडसूळ कुंडलिक, श्री.किशोर मेंढेकर, श्री.वाघुम्बर मिसळे, श्री.रामदास चौरे, श्री.खंडू सोनटक्के, श्री.बंकट कस्पटे, श्री.रामहरी बनसोडे, रज्जाकभाई पटेल, बाबाभाई शेख आदींची उपस्थिती होती.
#Development #dharashiv #Road #विकास #धाराशिव