
सातासमुद्रापार शिवजयंती.. पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात शिवजयंती साजरी करणाऱ्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातील युवकाचा सत्कार.
सातासमुद्रापार शिवजयंती.. पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात शिवजयंती साजरी करणाऱ्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातील युवकाचा सत्कार.. अभिमानास्पद!
युगांडा देशात कामानिमित्त स्थायिक झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करून, पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी केली, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
युगांडा येथे स्थायिक महाराष्ट्रातील कुटुंबीयांनी एकत्र येऊन २७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती. मराठी नागरिकांची ही नोंदणीकृत संस्था आहे.
सदरील महामंडळात १०० कुटुंब सभासद आहेत. यामध्ये ५०० हून अधिक सभासदांचे एक कुटुंब तयार झाले आहे. दरवर्षी महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवजयंतीचा उत्सव प्रदेशात साजरा करणाऱ्या आपल्या भूमिपुत्रांचा सार्थ अभिमान वाटतो.
#छत्रपती #शिवाजी #महाराज #जयंती #युगांडा #धाराशिव #chatrapatishivajimaharaj #jayanti #dharashiv