
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात ‘मतदार संवाद’ बैठक संपन्न झाली.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात ‘मतदार संवाद’ बैठक संपन्न झाली.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतले आहेत. किंबहुना त्या निर्णयाची अंमलबजावणी देखील होत आहे.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा जो प्रश्न डॉ.साहेबांनी लाऊन धरला होता, त्याची पूर्तता आज अनेक वर्षांनी राज्य सरकारने केली आहे. यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ११,६०० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
वॉटर ग्रीड, एमआयडीसी, औद्योगिक वसाहत, टेक्सटाईल प्रकल्प अशा अनेक महत्वपूर्ण कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ई-पाहणीच्या ज्या अटींमुळे अडचण निर्माण होत होती ती अट शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर केवळ १५ दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करून सदरील अट शिथिल करण्यात आली आहे.
यापुढेही शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा, प्रकल्प निर्माण करायचे आहेत. मात्र त्यासाठी राजकीय ताकद दाखवावी लागेल. त्या अनुषंगाने बाजार समितीची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे.
त्यामुळे आपल्या श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजय करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्वांनी ‘विमान’ या चिन्हा समोर फुलीचा शिक्का मारून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन यावेळी केले.
#बाजार #समिती #निवडणूक #धाराशिव #election #dharashiv