
तुळजापूर यांच्या वतीने वीर लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा लोहिया मंगल कार्यालय, तुळजापूर येथे संपन्न झाला
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त काशीपिठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत श्री वीरशैव जंगम मठ ट्रस्ट, तुळजापूर व श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर यांच्या वतीने वीर लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा लोहिया मंगल कार्यालय, तुळजापूर येथे संपन्न झाला.. यावेळी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या पाल्यांना सुयोग्य जोडीदार निवडण्यासाठी वधु-वर मेळावे ही काळाची गरज बनली आहे. वधूच्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी स्थळ पाहताना शेतकऱ्यांच्या मुलाचा विचार करावा व त्यांनाही प्राधान्य द्यावे असे मत श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्याचे जाहीर करण्यात आले.
सदरील मेळाव्यात २०० पेक्षा अधिक वधू-वरांची नोंदणी झाली आहे. तुळजापूर येथील विवाह इच्छुक असलेल्या शेकडो युवक आणि युवतींना या कार्यक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होईल हा विश्वास आहे.
नळदुर्ग-अणदुर महामार्गावर २ एकर जागेत सुंदर उद्यान तयार करून तेथे महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे.
वैद्यकीय शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉ.बसवराज युवराज वट्टे, डॉ.अनिकेत आदीनाथ ठेले, डॉ.सौरभ सुनील मस्के, डॉ.पृथ्वीराज वैजीनाथ मिटकरी, डॉ.प्राची श्याम तोडकरी, डॉ.ईश्वर तानाजी महाजन, डॉ.ऋषिकेश सचिन मुंडे, सरपंच सरोजिनीताई कबाडे, श्री.रामेश्वर वैद्य, श्री.हनुमंत पाटील, श्री.प्रविण पाटील, श्री.युवराज पाटील, ॲड.सोमेश वैद्य व कृष्णाई उळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री.राजाभाऊ मुंडे, श्री.रामचंद्र आलुरे, श्री.नितीन काळे, ॲड.दिपक आलुरे, संयोजक श्री.गुरुनाथ बडुरे यांची उपस्थिती होती.
#महात्मा #बसवेश्वर #जयंती #लिंगायत #समाज #वधुवर #मेळावा #तुळजापूर #Mahatma #basveshwar #lingayat