
नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार!
नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार!
गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी धाराशिव जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची मागणी होती. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गालगत उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी केली. या ठिकाणी सुसज्ज उद्यानासह अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..
महात्मा बसवेश्वरांनी महिलांवरील अत्याचार व उच्च-नीच भेदभाव संपवण्यासाठी मोठा लढा दिला. समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे विचार सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून जिल्ह्यात त्यांचा एकही अश्वारूढ पुतळा नसल्याने असा पुतळा उभारण्याची लिंगायत समाजबांधवांची अनेक दिवसांची मागणी होती.
नळदुर्ग या शहराला ऐतिहासिक महत्व असून गोलाई येथे सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत उपलब्ध असलेल्या जागेवर सुसज्ज उद्यानासह महात्मा बसवेश्वर यांच्या कर्तृत्वाला साजेसा अश्वारूढ पुतळा, ध्यान केंद्र, बागबगीचा व सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नळदुर्ग शहर व समाजातील प्रमुख व्यक्तींसमवेत या जागेची पाहणी केली.
या संदर्भात अधिक्षक अभियंता श्री.बी.एम.थोरात यांना २ आठवड्यात वास्तुविशारद तज्ञांच्या सहकार्याने अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत नागरिकांच्या काही सूचना अथवा संकल्पना असल्यास mahatmabasweshwarstatue@gmail.com या इमेल वर पाठवाव्या ही विनंती.
यावेळी ॲड.श्री.दिपकदादा आलुरे, श्री.वसंतराव वडगावे, श्री.संजय बताले, श्री.दत्तात्रय कोरे, श्री.महालिंग स्वामी, श्री.बसवराज धरणे, श्री.सुभाष कोरे, श्री.निलय्या स्वामी, श्री.संगमेश्वर व्हणाळे, श्री.दयानंद स्वामी, श्री.राजू पिचे, श्री.संतोष वाले, श्री.खंडेशा कोरे, श्री.बाबुराव मुळे, श्री.मल्लिनाथ बाळुरकर, श्री.सागर कलशेट्टी, श्री.राजू तोग्गे, श्री.महादेव सालगे श्री.अप्पासाहेब पाटील, श्री.दयानंद मुडके, श्री.सागर मुळे, श्री.भीमाशंकर बताले, श्री.मुन्ना वाले, श्री.अमोल मुळे, श्री.शिवय्या स्वामी, श्री.वीरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बेडगे व लिंगायत समाज बांधवांची उपस्थिती होती.
#महात्मा #बसवेश्वर #नळदुर्ग #धाराशिव #Mahatma #basveshwar #Dharashiv #naldurga