
काटी, ता.तुळजापूर येथे विकास कामांसाठी ३ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..
काटी, ता.तुळजापूर येथे विकास कामांसाठी ३ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..
येथे अहमदनगरचा निजाम बुर्हाणशहा याच्या काळात (इसवी सन १६०४) बांधलेली प्रसिद्ध जामा मस्जिद आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाकडे आपण सातत्याने विशेष पाठपुरावा केला होता.. सदरील गाव तुळजापूर पासून २४ किलोमीटर अंतरावर आहे.
बुर्हाणशहाचा सरदार याकुतच्या बायकोने मेहेरच्या पैशातून या मस्जिदीची निर्मिती केली होती. काळ्या बेसॉल्ट मध्ये बांधलेली ही मस्जिद दख्खनी शैलीच्या इस्लामी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. पूर्वाभिमुख भव्य सदर दरवाजा, दरवाजाच्या चारही बाजूला सडपातळ मिनार, मिनारांवर फुलांची आणि पाकळ्यांची नक्षी, मिनाराच्या वर छोटे घुमट व घुमटाखाली उठावदार पाकळ्या असून दरवाजाचा आतील भाग अनेक कमानींचा बनवलेला आहे.
वजूसाठी तलाव, विहीर, दरवाजाचा आतील भाग अनेक कमानींचा बनवलेला आहे. मस्जिदीच्या चौकोनी इमारती भोवती फिरवलेल्या फुलांच्या पट्टीमुळे (cornice) इमारत २ मजली असल्याचा भास होतो.
मस्जिदीच्या आतील भिंतीवर कुराणातील आयात आणि सुविचार फारसी भाषेत कोरलेले आहेत. आश्चर्याचा भाग म्हणजे भिंतीवर कोरलेली ही अक्षरे सहजासहजी दिसत नाहीत. त्यावर पाणी मारल्यास ती अक्षरे दिसतात.
मस्जिदीच्या परिसरात चारही बाजूला रिवाक (तटबंदी) आहे. पूर्णपणे दगडात बांधलेली आणि दगडातील अप्रतिम कोरीव कामासाठी, नक्षीकामासाठी, अभिनव प्रयोगासाठी ही आडवाटेवर असलेली मस्जिद पुरातन बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.
अशा प्रकारच्या वास्तु या आपल्या जिल्ह्याचे वैभव असून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे.. सदरील काम लवकरच पूर्ण होऊन मस्जिदीचे पूर्णपणे संवर्धन केले जाईल..
#मस्जिद #संवर्धन #धाराशिव #Mosque #Conservation #masjid #dharashiv