
तुळजापूर येथील अभियंता श्री.सुहास राऊत यांच्या राऊ डिजाइन आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे उद्घाटन संपन्न झाले.
तुळजापूर येथील अभियंता श्री.सुहास राऊत यांच्या राऊ डिजाइन आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे उद्घाटन संपन्न झाले.
अतिशय बिकट परिस्थितीतून संघर्ष करत अभियंता श्री.सुहास राऊत यांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. आपल्या तुळजापूर शहरातील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ त्यांची आई मेस चालवत असे.
तिथे जेवायला येणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांनी अभियंता होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र प्रवास खडतर होता, परिस्थिती बिकट होती. ५ वर्षाचा कोर्स पूर्ण करायला त्यांना ८ वर्ष घालवावी लागली मात्र ते थांबले नाहीत.
पुणे येथे वास्तू कन्सल्टन्सी या आंतरराष्ट्रीय, उच्च दर्जाच्या कंपनीत त्यांनी काम केले. दुबई, बाली, सिंगापूर, मलेशिया अशा विविध विकसनशील देशात त्यांनी काम केले आहे. मात्र २००९ मध्ये वडिलांची प्रकृती खालवल्यामुळे ते तुळजापुरला स्थायिक झाले. श्री.प्रकाश मगर आणि श्री.रणजित गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर नव्याने व्यवसाय सुरू केला.
आज धाराशिव जिल्ह्यात कन्स्ट्रक्शन क्षेत्रात त्यांनी उत्तम यश मिळवले असून आजही ते प्रचंड मेहनत घेतात. आपल्या ग्राहकांना पूर्णपणे समाधानी करण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असतो.
जागतिक स्तरावर सदरील क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडींवर देखील त्यांचे लक्ष असते. अशा भूमिपुत्रांचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांचे स्वप्न पूर्ण होवो, त्यांच्या या व्यवसायाला अधिकाधिक यश मिळो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..
#व्यवसाय #धाराशिव #bussiness #dharashiv