skip to Main Content
गौडगाव, ता.जि.धाराशिव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रु.२५ लक्ष निधीतून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.

गौडगाव, ता.जि.धाराशिव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रु.२५ लक्ष निधीतून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.

गौडगाव, ता.जि.धाराशिव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रु.२५ लक्ष निधीतून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. सदरील काम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे.
आपल्या आमदार निधीतून कचरा संकलन घंटा गाडीसाठी रु.८ लक्ष, इतर योजनेतून महिला सभागृहासाठी व स्मशानभूमीसाठी प्रत्येकी रु.७ लक्ष, गौडगाव ते गौडगाव पाटी या रस्त्यासाठी रु.३० लक्ष इत्यादी कामे मंजूर झालेली असून याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच श्री.बालाजी भोसले, उपसरपंच श्री.अपसर पटेल, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुधाकर माळी, श्री.लक्ष्मण ढेरे, श्री.मनोज माळी, श्री.अंकुश हुंबे, पोलीस पाटील श्री.हारूण पटेल, महिला कार्यकर्ते निलोफर पठाण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
#विकास #निधी #ग्रामीण #धाराशिव #devlopment #fund #village #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.