
वैराग्याचा महामेरू, संत गोरोबाकाका यांच्या समाधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत!
वैराग्याचा महामेरू, संत गोरोबाकाका यांच्या समाधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत !
श्री संत गोरोबा काकांचा ७०७ वा वार्षिक संजीवन समाधी सोहळा तथा यात्रा महोत्सव सुरू झाला असून या सोहळ्यासाठी परिसर तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक दिंड्या, पालख्या व हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तसेच भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येणारे काही दिवस परिसरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम‘ या हरिनामाचा गजर सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. या ऊर्जेत समाधानी होणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरील भाव मनाला सुखावून जातात.
दरवर्षीप्रमाणे पुढील ४ दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी, मिरवणूक, गोपाळ काला असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
#तेर #यात्रा #गोरोबाकाका #धाराशिव #ter #yatra #dharashiv #gorobakaka