skip to Main Content
तुळजापूर, ढोकी, बसवंतवाडी, सटवाईवाडी, तांदुळवाडी, इंदापूर येथील अन्य पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात दाखल..

तुळजापूर, ढोकी, बसवंतवाडी, सटवाईवाडी, तांदुळवाडी, इंदापूर येथील अन्य पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात दाखल..

तुळजापूर, ढोकी, बसवंतवाडी, सटवाईवाडी, तांदुळवाडी, इंदापूर येथील अन्य पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात दाखल..
पक्ष नेतृत्व व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन तुळजापुर शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.लखन भालचंद्र पेंदे, ढोकी येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते श्री.सतीश (पप्पू) वाकुरे व बसवंतवाडी येथील श्री.हरिदास भोसले (आई उपसरपंच), श्री.हनुमंत पारवे (तंटामुक्ती अध्यक्ष) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी श्री.विनोद (पिटू) गंगणे व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच वाशी तालुक्यातील तांदुळवाडीचे माजी सरपंच श्री.मधुकांत चौधरी, श्री.नामदेव चौधरी, श्री.सचिन चौधरी, श्री.रामहरी भांडगुडे, श्री.अप्पासाहेब उंदरे, श्री.अतुल चौधरी, श्री.शिवाजी चौधरी, श्री.मधुकर खोसे यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.श्री.भागवतजी कराड साहेब यांच्या हस्ते सर्वांचे पार्टीत स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
वाशी तालुक्यातील सटवाईवाडी गावचे माजी सरपंच श्री.नानासाहेब खोत, श्री.बाबासाहेब पवार, श्री.औदुंबर फरताडे, श्री.विष्णू ढवळे, श्री.माधव बप्पा खोत, श्री.दत्तात्रय मोरे, श्री.मकरंद गोळे, श्री.कैलास खोत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच पक्षाची ध्येय-धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले.
इंदापूर गावातील श्री.रोहन गपाट, श्री.किरण कोळी, श्री.गणेश शिंदे, श्री.अक्षय गपाट, श्री.विजय गपाट, श्री.सुरेश गपाट, श्री.विशाल गपाट, श्री.नितीन गपाट या तरुणांनी देखील पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, सौ.अर्चना पाटील यांच्यासह संबंधीत गावाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#पक्ष #प्रवेश #भाजपा #धाराशिव #party #bjp #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.