skip to Main Content
काटी, ता.तुळजापूर येथे आपल्या हस्ते ३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

काटी, ता.तुळजापूर येथे आपल्या हस्ते ३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

काटी, ता.तुळजापूर येथे आपल्या हस्ते ३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान आदरणीय मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ व ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हा विचार समोर ठेऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचा अभूतपूर्व असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून सर्व घटकांना न्याय दिला आहे.
‘महाबजेट’ अंतर्गत ग्रामस्थांना अर्थसंकल्पातील लोककल्याणकारी विविध योजनांची माहिती दिली. महिलांना बस प्रवासात मध्ये ५०% सवलत, लेक लाडकी योजना, शेतकरी बांधवांसाठीच्या योजना, विविध समाजासाठी सुरू करण्यात आलेली आर्थिक विकास महामंडळे यांची माहिती दिली.
सरकारने या अर्थसंकल्पामध्ये धारशिव जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेले, अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेले सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग, तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्पाची मंजूरी, कृष्णा-मराठवाडा प्रकल्प व वॉटर ग्रीड साठी निधी असे विविध निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी काटी ते जवळगाव रस्ता डांबरीकरण करणे (रु. ७५ लक्ष ), राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना (रु. ७५ लक्ष ), जामा मंदिर ते भैरवनाथ मंदिर सिमेंट रस्ता (१० लक्ष रु.), श्री.अमर देशमुख यांचे घर ते खंडोबा मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता (रु.६ लक्ष), जामा मजीद ते भैरवनाथ मंदिर सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष) या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
तर जिल्हा परिषद शाळेसमोरील सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष), काटी ते खुंटेवाडी रस्ता डांबरीकरण (रु.३० लक्ष), काटी बस स्टॅन्ड सिमेंट रस्ता (रु.१५ लक्ष), श्री.जयसिंग सावंत यांच्या घरापासून ते श्री.दत्ता सुळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष), श्री.रहीम बेग ते मदिना मस्जिद सिमेंट रस्ता (रु.२०लक्ष), आरोग्य उपकेंद्र बांधकाम (रू.८७ लक्ष), जनावरांचा दवाखाना (रू.३० लक्ष), आरोग्य उपकेंद्र वॉल कंपाऊंड (रू.१४ लक्ष) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
येथील ऐतिहासिक जामा मस्जिद दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडे विशेष पाठपुरावा करण्यासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंह देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दीपक आलुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजकुमार पाटील, श्री.यशवंत अण्णा लोंढे, श्री.सज्जनराव साळुंखे, श्री.पिटूभैय्या गंगणे, श्री.सचिन पाटील, श्री.विजय गंगणे सर, श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, श्री.आनंद कंदले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#विकास #ग्रामीण #धाराशिव #devlopment #village #dharashiv #tuljapur #तुळजापूर

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.