skip to Main Content
‘लोकसभा प्रवास योजना‘ आढावा बैठक केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

‘लोकसभा प्रवास योजना‘ आढावा बैठक केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

‘लोकसभा प्रवास योजना‘ आढावा बैठक केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदार संघांमध्ये उत्तम संघटन असून प्रामाणिक, कष्टाळू व समर्पक कार्यकर्त्यांचा संच आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांचे कार्य व लाभार्थ्यांना होत असलेली थेट मदत यामुळे देशवासियांचा मा.मोदी साहेबांवर मोठा विश्वास आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ना.डॉ.भागवत कराड साहेब यांच्यावर सोपविण्यात आली आहे. धाराशिव येथे लोकसभा कोअर समिती व या अंतर्गत समाविष्ट ६ विधानसभा कोअर समिती सदस्यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, मागील ८ वर्षांमध्ये देशाचा प्रचंड विकास झाला आहे. ९ व्या स्थानावरील अर्थव्यवस्था आज ५ व्या स्थानी आली आहे. कोरोना महामारीच्या संकटात देखील देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात आपण यश मिळविले आहे. देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असून त्याचे संपूर्ण श्रेय मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांना जाते. देशात अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालये व आयुर्विज्ञान संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. रस्त्याचे जाळे मजबूत करून दळणवळणाला मोठी चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची अभूतपूर्व प्रगती सुरू असून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून थेट मदत मिळत आहे.
पक्षात संघटन व सेवा कार्य अतिशय महत्त्वाचे असून कार्यक्रमांमध्ये समोर बसणारा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज केंद्रीय मंत्र्याच्या रूपाने तुमच्यासमोर उभा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कसोशीने निर्णय पाळणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज असून येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या ताकतीनिशी काम करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी धाराशिव लोकसभा प्रभारी श्री.गुरुनाथ मगे, संघटन मंत्री श्री संजय कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा जिल्हा समन्वयक श्री.नेताजी पाटील, श्री.सुधीर अण्णा पाटील, धाराशिव लोकसभा व त्या अंतर्गत येणाऱ्या ६ विधानसभा कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते.
#लोकसभा #विधानसभा #निवडणूक #धाराशिव #loksabha #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.