
धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
धाराशिव तालुक्यातील करजखेडा, ताकवीकी, धारूर, बामणी, वाडी बामणी, तुळजापूर तालुक्यातील मुर्टा (तडवळा) गावांमध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून बळीराजाला धीर दिला. तसेच महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याची सूचना देण्यात आली.
शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून फुलवलेल्या फळबागांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. कष्टाने फुलवलेल्या फळबागा मातीमोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. गहू, ज्वारी, कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्षे, अंबा, टरबूज, कलिंगड अशा सर्वच पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसाने न पाहवणारे नुकसान होत आहे. महसूल प्रशासनाकडून पंचनामे प्राप्त होताच राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्याचे यावेळी आश्वासन दिले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितिन काळे, जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, धाराशिव तालुकाध्यक्ष श्री.राजाभाऊ पाटील, धाराशिव तहसीलदार श्री.गणेश माळी, नायब तहसीलदार श्री.काकडे, नायब तहसीलदार श्री.शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी श्री.नलावडे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.राऊत, तालुका कृषी अधिकारी धाराशिव श्री.जाधव, तालुका कृषी अधिकारी तुळजापूर श्री.बीडबाग, संबंधित गावातील तलाठी, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
#पाऊस #नुकसान #मदत #धाराशिव #rain #damage #help #dharashiv