संत गोरोबाकाकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेर परिसरातील दाऊतपूर, ता.धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
संत गोरोबाकाकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेर परिसरातील दाऊतपूर, ता.धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्रीकृष्ण, श्रीराम-लक्ष्मण-सिता व श्री गुरुदत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून ह.भ.प.श्री.भाऊसाहेब घाटणेकर महाराज, माढा यांच्या कीर्तनाचा आनंद घेतला.
खंडोबा मंदिर समोरील सभामंडपासाठी आपल्या आमदार निधीतून रू.१० लक्ष उपलब्ध करून दिले आहेत. या कामाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#सप्ताह #कीर्तन #धाराशिव #dharashiv