
महाराष्ट्रातील कन्येसाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू.. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवश्य पुढाकार घ्यावा..
महाराष्ट्रातील कन्येसाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू.. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवश्य पुढाकार घ्यावा..
नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात सादर केला. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही विशेष योजना लक्षवेधी ठरली आहे.
राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे ५,००० रुपये जमा केले जातील.
त्यानंतर मुलगी चौथीत असताना ४,००० रुपये, सहावीत असताना ६,००० रुपये आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८,००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलींचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५,००० रुपये रोख दिले जाणार आहेत.
सर्वांनी या सकारात्मक कार्यात पुढाकार घ्यावा आणि एका अर्थाने राष्ट्र सशक्तीकरण कार्यात सहभाग नोंदवावा.
#मुलगी #लेक #अर्थसंकल्प #धाराशिव #girl #Budget2023 #dharashiv