
पक्ष नेतृत्वावर तसेच आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी, मंगरूळ येथील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्ष नेतृत्वावर तसेच आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी, मंगरूळ येथील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सरडेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य श्री.ज्ञानेश्वर धुरगुडे, श्री.प्रमोद धुरगुडे, मंगरूळ ग्रामपंचायतचे सदस्य श्री.गोविंद डोंगरे यांचा समावेश आहे.
या प्रवेशासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.चित्तरंजन सरडे, माजी उपसरपंच श्री.प्रतापसिंह सरडे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
भूमिहीन असूनही मेहनतीच्या जोरावर पुणे येथे प्रशस्त घर बांधणारे, बीएमडब्ल्यू सारखी उच्च दर्जाची गाडी घेणारे श्री.ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. फुलांचा व्यवसाय सुरू करून आपल्या भागातील तरुणांसाठी त्यांनी रोजगार निर्माण केला ही कौतुकास्पद बाब आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#भाजपा #पक्ष #व्यवसाय #रोजगार #धाराशिव #bjp #bussiness #Employment #dharashiv